- प्रभूचा बाप्तिस्मा
- दोन ध्वज
- माणसांचे तीन प्रकार
- मोह
- प्रेषितांना पाचारण
- काना येथील विवाहसोहळा
- मंदिराचे शुद्धीकरण
- डोंगरावरील प्रवचन
- वादळ शांत करणे
- पाण्यावरून चालणे
- प्रेषितांना सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी पाठवले
- मरिया मग्दालेनाचे मनपरिवर्तन
- ख्रिस्ताने पाच हजार लोकांना कसे जेवू घातले
- ख्रिस्ताचे रूपांतर
- लाझरचे पुनरुत्थान
- बेथानीतील रात्रीचे भोजन
- नम्रतेचे तीन मार्ग
मऊ मुखपृष्ठाच्या छापील आवृत्तीत आणि ई-पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध:
ॲमेझॉन – गूगल प्ले– आयट्यून्स – बार्न्स & नोबल
परिचय
या विभागातील सतरा ध्याने वर्षातील सामान्य काळाच्या दोन्ही टप्प्यांत वापरायची आहेत. या विभागातील बहुतेक ध्याने आध्यात्मिक साधना या ग्रंथाच्या “दुसऱ्या आठवड्यातून” घेतली आहेत.
प्रथम, नाताळचा काळ संपल्यावर प्रभूच्या बाप्तिस्म्याच्या सणापासून सुरुवात करा. हा सण सामान्य काळातील पहिल्या रविवारच्या जागी साजरा केला जातो. राखेचा बुधवार कोणत्या तारखेला येतो, त्यानुसार सामान्य काळाच्या या पहिल्या टप्प्याचा कालावधी दरवर्षी बदलतो. त्यामुळे प्रायश्चित्तकाळ सुरू होण्यापूर्वीच्या सामान्य काळात यांपैकी काहीच ध्याने तुम्ही वापराल.
पेंटेकॉस्टचा महोत्सव साजरा झाल्यावर पास्काचा काळ संपतो. त्यानंतर या विभागातील उरलेली ध्याने वापरा. म्हणजेच, सामान्य काळ पुन्हा सुरू झाल्यावर ही उरलेली ध्याने करायची आहेत. सामान्य काळाच्या या दुसऱ्या टप्प्यात, उन्हाळ्याच्या अखेरीस किंवा शरद ऋतूच्या सुरुवातीला तुमची सर्व ध्याने पूर्ण झाली, तर ज्या ध्यानांनी तुमच्या मनाला विशेष स्पर्श केला, ती वर्षभरात पुन्हा करायला हरकत नाही.
