पवित्र शास्त्राचे वाचन: मत्तय 8:23–27
संदर्भ: परंपरेनुसार, नाव ही ख्रिस्तसभेचे प्रतीक आहे. ख्रिस्त आपल्या सभेत सदैव उपस्थित असतो, पण कधीकधी तो ‘झोपलेला’ आहे असे वाटते. संपूर्ण ख्रिस्तसभेच्या जीवनात आणि तुमच्या वैयक्तिक जीवनातही वेळोवेळी वादळे उठत राहतील.
या उताऱ्यात शिष्य वादळामुळे घाबरले आहेत, हे त्यांच्या शब्दांतून स्पष्ट होते: “प्रभू, आम्हाला वाचव; आम्ही बुडत आहोत.” त्याचप्रमाणे, जीवनातील वादळांना तोंड देताना तुम्हालाही भीती सहज ग्रासू शकते. पण जेव्हा भीती तुम्हाला ग्रासते, तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटलेले हे शब्द तो तुम्हालाही उद्देशून म्हणत आहे, हे लक्षात घेऊन ते ऐका: “अहो अल्पश्रद्धावानांनो, तुम्ही का घाबरता?”
येशूने वादळ शांत केल्यावर त्याचा अधिकार पाहून शिष्य “थक्क झाले.” तो तुमच्या जीवनातील वादळांत येऊन ती शांत करतो, हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
मनन: हा उतारा पुन्हा सावकाश आणि प्रार्थनापूर्वक वाचताना पुढील गोष्टींवर मनन करा:
- आजवर तुम्ही कोणकोणत्या वादळांना तोंड दिले आहे?
- सध्या तुम्ही कोणत्या वादळाला तोंड देत आहात?
- आपण त्या नावेत आहोत अशी कल्पना करा. शुभवर्तमानात वर्णन केलेल्या त्या प्रत्यक्ष वादळात तुमच्या जीवनातील वादळ पाहा.
- येशू तिथे आहे, हे ध्यानात घ्या.
- स्वतःला त्याच्या स्वाधीन करून आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला जागे करा.
- तुमच्या जीवनावर आणि तुम्ही ज्या कठीण परिस्थितीत असाल तिच्यावरही त्याचा अधिकार आहे, हे पाहा.
- देव तुमच्या जीवनातील वादळांत कसा आला आणि त्यांतून त्याने तुम्हाला कसे पार नेले, हे आठवून स्वतःला “थक्क” होऊ द्या. देवाने अशा प्रकारे तुमच्या जीवनात हस्तक्षेप केला, याबद्दल कृतज्ञता जोपासणे आवश्यक आहे.
ठळक चित्र: युजेन द ला क्र्वा – वादळात झोपलेला ख्रिस्त
- प्रभूचा बाप्तिस्मा
- दोन ध्वज
- माणसांचे तीन प्रकार
- मोह
- प्रेषितांना पाचारण
- काना येथील विवाहसोहळा
- मंदिराचे शुद्धीकरण
- डोंगरावरील प्रवचन
- वादळ शांत करणे
- पाण्यावरून चालणे
- प्रेषितांना सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी पाठवले
- मरिया मग्दालेनाचे मनपरिवर्तन
- ख्रिस्ताने पाच हजार लोकांना कसे जेवू घातले
- ख्रिस्ताचे रूपांतर
- लाझरचे पुनरुत्थान
- बेथानीतील रात्रीचे भोजन
- नम्रतेचे तीन मार्ग
