मराठी

मरिया मग्दालेनाचे मनपरिवर्तन

पवित्र तासाचा क्रम

पवित्र शास्त्रवाचन: लूक 7:36–50

संदर्भ: शिमोन नावाच्या एका परुश्याने येशूंना आपल्या घरी जेवायला बोलावले. पाहुणे आल्यावर चुंबन देऊन त्यांचे स्वागत करणे, त्यांच्या मस्तकाला तेल लावणे आणि पाय धुण्यासाठी पाणी देणे, ही शिष्टाचाराची नेहमीची रीत होती. शिमोनने यांपैकी काहीच केले नाही.

मात्र, या कथेत शिमोनच्या आदरातिथ्यातील उणिवेपेक्षा पश्चात्ताप केलेल्या त्या स्त्रीचा मनापासूनचा चांगुलपणा अधिक महत्त्वाचा आहे. “तिने खूप प्रेम केले” म्हणून तिला क्षमा मिळाली, हे येशू दाखवून देतात. अशा रीतीने तिचे प्रेम आणि येशूंनी दयाळूपणे केलेली क्षमा हे या कथेचे केंद्र आहे.

शिमोन इतरांना दोष देण्यात किती तत्पर होता, हेही या कथेतून दिसते. येशू त्याच्या मनातले विचार ओळखतात आणि त्याच्या ठायी प्रेमाची उणीव आहे, हे त्याला सौम्यपणे दाखवून देतात; पण त्या स्त्रीच्या गाढ प्रेमाचा ते आदर करतात.

चिंतन: वर दिलेला पवित्र शास्त्रातील उतारा प्रार्थनापूर्वक वाचा. ध्यान करताना उपयुक्त वाटल्यास पुढील मुद्द्यांवर चिंतन करा:

  • येशू शिमोनच्या घरी येतात, असा प्रसंग डोळ्यांसमोर आणा. त्यांच्या स्वागतामध्ये काय उणे राहिले, याकडे लक्ष द्या. शिमोन कसा असेल, याची कल्पना करा.
  • त्या पापी स्त्रीच्या धैर्यावर चिंतन करा. निमंत्रण नसताना त्या मेजवानीला जाताना तिच्या मनात किती धाकधूक झाली असेल, याचा विचार करा. तिला कोणकोणत्या भीतींवर मात करावी लागली असेल, याचाही विचार करा.
  • तिची आणि येशूंची नजर पहिल्यांदा एकमेकांना भिडली, तेव्हा तिच्या अंतःकरणात काय चालले असेल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कोणत्या भावनांनी तिला जमिनीपर्यंत वाकायला, त्यांच्या चरणांचे चुंबन घ्यायला, त्यांना आपले सुगंधी द्रव्य लावायला आणि अनावर होऊन रडायला लावले असेल, याची कल्पना करा.
  • येशूंच्या अंतःकरणात डोकावून पाहा. त्या स्त्रीविषयी त्यांना वाटणारी करुणा आणि मनापासूनची काळजी पाहा.

“तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,” या शब्दांवर चिंतन करा. तसेच या शब्दांवरही चिंतन करा: “तुझ्या श्रद्धेने तुझे तारण केले आहे; शांतीने जा.”

मुख्य चित्र: रुबेन्स — परुशी शिमोनच्या घरची मेजवानी

सामान्य काळातील ध्यानांची ओळख

  1. प्रभूचा बाप्तिस्मा
  2. दोन ध्वज
  3. माणसांचे तीन प्रकार
  4. मोह
  5. प्रेषितांना पाचारण
  6. काना येथील विवाहसोहळा
  7. मंदिराचे शुद्धीकरण
  8. डोंगरावरील प्रवचन
  9. वादळ शांत करणे
  10. पाण्यावरून चालणे
  11. प्रेषितांना सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी पाठवले
  12. मरिया मग्दालेनाचे मनपरिवर्तन
  13. ख्रिस्ताने पाच हजार लोकांना कसे जेवू घातले
  14. ख्रिस्ताचे रूपांतर
  15. लाझरचे पुनरुत्थान
  16. बेथानीतील रात्रीचे भोजन
  17. नम्रतेचे तीन मार्ग

अनुक्रमणिका