मराठी

शेवटचे भोजन

पवित्र तासाचा क्रम

पवित्र शास्त्रवाचन: मत्तय 26:17–30; योहान 13:1–30

संदर्भ: शेवटच्या भोजनाच्या प्रसंगात ध्यानासाठी विशेषतः तीन मुद्दे आहेत. प्रथम, शिष्यांचे पाय धुताना येशूची नम्रता पाहा. दुसरे, यहूदाने येशूचा विश्वासघात केला, त्या प्रसंगातून दुष्टतेच्या रहस्यावर मनन करा. तिसरे, परमपवित्र युखरिस्ताच्या स्थापनेवर चिंतन करा.

चिंतन: वर दिलेली शेवटच्या भोजनाची दोन्ही वर्णने प्रार्थनापूर्वक वाचा. मग, उपयोगी वाटल्यास, योहानाच्या वर्णनावर ध्यान करण्यासाठी पुढील मुद्दू लक्षात घ्या:

  • शेवटचे भोजन हे येशूच्या दुःखसहनाकडे आणि मृत्यूकडे नेणारे पहिले आणि अगदी जवळचे पाऊल होते. पुढे काय घडणार आहे हे शिष्यांना माहीत नव्हते, पण येशूला ते माहीत होते. योहानाचा 13 वा अध्याय वाचायला सुरुवात करताना, आपण स्वतः त्या भोजनाला उपस्थित आहोत अशी ध्यानात कल्पना करा.
  • पेत्राच्या प्रतिक्रियेचा विचार करा. त्याच्या शब्दांवर मनन करा. तुम्ही काय म्हटले असते? येशू तुमचे पाय धूत आहे, हे दृश्य डोळ्यांसमोर आणा.
  • यहूदाविषयी चिंतन करा. त्याच्या मनात काय चालले असेल? यहूदाच्या विश्वासघाताची जाणीव असलेल्या येशूला डोळ्यांसमोर आणा. यहूदाने काय केले होते हे पूर्णपणे माहीत असूनही येशू त्याचे पाय धूत आहे, त्या क्षणाची कल्पना करा.
  • आपल्या शिष्यांचा विचार करणाऱ्या येशूला डोळ्यांसमोर आणा. आपल्याला अटक होताना, आपला छळ होताना आणि आपल्याला ठार मारले जाताना शिष्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे लागेल आणि तेव्हा त्यांना काय सोसावे लागेल, हे येशूला माहीत होते.
  • योहानाच्या वर्णनातील 31 व्या वचनात येशू म्हणतो, “आता मानवपुत्राचे गौरवीकरण झाले आहे…” त्या “गौरवावर” थोडा वेळ चिंतन करा. लवकरच ज्या क्रुसावर येशूला खिळले जाणार होते, तो क्रूस त्याचे सिंहासन आहे असे पाहा. आणखी कोणत्या अर्थाने येशूच्या दृष्टीने ही हिंसक कृती “गौरव” होती?
  • तुमच्या जीवनातील क्रूस आणि दुःखे यांचे गौरवात रूपांतर कसे होऊ शकते?
  • मत्तय 26:26–29 या उताऱ्यावर पुन्हा विचार करा. हे पहिले पवित्र मिस्साबलिदान होते. हा पहिला युखरिस्त होता. पुढील तीन मुद्दे लक्षात घेऊन युखरिस्तावर प्रार्थनापूर्वक मनन करा: 1) प्रत्येक वेळी तुम्ही मिस्साला उपस्थित राहता, तेव्हा येशूच्या संपूर्ण दुःखसहनाच्या, त्याच्या शेवटच्या भोजनाच्या, क्रुसावर खिळले जाण्याच्या आणि पुनरुत्थानाच्या प्रसंगी तुम्ही गूढ रीतीने, पण खरोखरच उपस्थित असता. 2) प्रत्येक वेळी तुम्ही पवित्र कम्युनियन स्वीकारता, तेव्हा तुम्हाला देवपुत्राचे शरीर, रक्त, आत्मा आणि देवत्व प्राप्त होते. 3) प्रत्येक वेळी तुम्ही परमपवित्र संस्कारासमोर गुडघे टेकता, तेव्हा तुम्ही आवृत रूपात उपस्थित असलेल्या सर्वशक्तिमान देवासमोर गुडघे टेकता. पण तो खरोखर देवच आहे. स्वर्गात देवदूत आणि संत ज्याची आराधना करतात व ज्याचा गौरव करतात, तोच तो देव आहे.

मुख्य चित्र: सेबास्तियानो रिची – शेवटचे भोजन

प्रायश्चित्तकाळातील ध्यानांची प्रस्तावना

  1. जीवनातील निर्णय आणि संकल्प
  2. झावळ्यांचा रविवार
  3. पवित्र गुरुवारापूर्वीच्या घडामोडी
  4. शेवटचे भोजन
  5. बागेत येशूची व्याकुळता
  6. येशूला अटक करून अन्नाससमोर आणले जाते
  7. येशूला कैफाससमोर आणले जाते
  8. येशूला पिलातासमोर आणले जाते
  9. येशूला हेरोदासमोर आणले जाते
  10. पिलातासमोर दुसरी सुनावणी
  11. येशू आपला क्रूस वाहतो आणि त्याला क्रूसावर खिळले जाते
  12. येशू क्रूसावरून बोलतो
  13. येशू क्रूसावर प्राण सोडतो
  14. आईच्या कुशीत येशूचे पार्थिव शरीर
  15. येशूला कबरीत ठेवले जाते
  16. पवित्र शनिवार

अनुक्रमणिका