मराठी

पवित्र शनिवार

पवित्र तासाचा क्रम

बोध: रात्र होताच शब्बाथ सुरू झाला. शब्बाथच्या दिवशी येशूच्या पार्थिवाची आणखी काळजी घेणे शक्य नव्हते. पवित्र शनिवार हा गाढ शांततेचा, दुःखाचा आणि आशेचा दिवस होता.

पहारेकरी कबरीसमोर पहारा देत राहिले. येशूचे अनुयायी भयभीत आणि गोंधळलेल्या अवस्थेत लपून राहिले. येशू आता त्यांच्यात नव्हता. काय विचार करावा, काय करावे, हे त्यांना कळत नव्हते. कदाचित काही जणांनी, विशेषतः आपल्या धन्य मरियम मातेने, येशूने तिसऱ्या दिवशी पुन्हा उठण्याचे जे वचन दिले होते, त्यावर विश्वास ठेवला आणि आशा सोडली नाही.

चिंतन: पवित्र शनिवारी उपासनेचा विधी साजरा केला जात नाही. हा शांततेचा आणि आशेचा दिवस आहे. या छोट्याशा ध्यानात, येशूच्या मृत्यूच्या घटनांशी ज्यांचा जवळचा संबंध होता आणि ज्यांच्या मनावर त्याचा खोल परिणाम झाला, अशा लोकांच्या वेगवेगळ्या अनुभवांवर चिंतन करा. 

पिलात, सैनिक, मुख्य याजक, शास्त्री आणि परुशी यांच्याविषयी निवांतपणे चिंतन करा. मग शिष्य, पवित्र स्त्रिया, आपली धन्य मरियम माता आणि येशूविषयी ज्यांना माहीत होते व ज्यांनी त्याच्यावर आशा ठेवली होती, त्या सर्वांपेक्षा ते कसे वेगळे होते, याचा विचार करा.

प्रमुख चित्र: कबरीवरील पहारा, तिसो

प्रायश्चित्तकाळातील ध्यानांची प्रस्तावना

  1. जीवनातील निर्णय आणि संकल्प
  2. झावळ्यांचा रविवार
  3. पवित्र गुरुवारापूर्वीच्या घडामोडी
  4. शेवटचे भोजन
  5. बागेत येशूची व्याकुळता
  6. येशूला अटक करून अन्नाससमोर आणले जाते
  7. येशूला कैफाससमोर आणले जाते
  8. येशूला पिलातासमोर आणले जाते
  9. येशूला हेरोदासमोर आणले जाते
  10. पिलातासमोर दुसरी सुनावणी
  11. येशू आपला क्रूस वाहतो आणि त्याला क्रूसावर खिळले जाते
  12. येशू क्रूसावरून बोलतो
  13. येशू क्रूसावर प्राण सोडतो
  14. आईच्या कुशीत येशूचे पार्थिव शरीर
  15. येशूला कबरीत ठेवले जाते
  16. पवित्र शनिवार

अनुक्रमणिका