मराठी

प्रेम

सर्वांत महत्त्वाचं आहे
  माझं तुझ्यावरचं प्रेम.
ते पावसासारखं आहे,
  कारण पाऊस ज्यावर पडतो
  ते सारं स्वच्छ करतो.
ते सूर्यासारखं आहे,
  कारण सूर्य सर्व सजीवांना
  नवी चेतना देतो.
ते हवेसारखं आहे,
  कारण ज्यांना जगण्यासाठी हवेची गरज आहे,
  त्या सर्वांना ती जीवन देते.

प्रेमाचा स्वभाव असा असेल,
  तर त्याचा लाभ घे.
प्रेमाचे आशीर्वाद स्वीकार
  आणि त्याची फळं
  तुझ्या वाटेवर भेटणाऱ्यांबरोबर वाटून घे.

पुढील चिंतन

अनुक्रमणिका