
स्मरण कर,
हे परम कृपाळू कुमारी मरिये,
असे कधीही ऐकिवात आले नाही की,
जो कोणी तुझ्या आश्रयाला धावून आला,
तुझ्या मदतीची याचना केली
किंवा तुझी मध्यस्थी मागितली,
तो मदतीविना राहिला.
याच विश्वासाने
मी तुझ्याकडे धाव घेतो,
हे कुमारिकांतील श्रेष्ठ कुमारिके, माझ्या माते;
मी तुझ्याकडे येतो,
तुझ्यासमोर उभा आहे,
पापी आणि दुःखी.
हे देहधारी शब्दाच्या माते,
माझ्या विनंत्या तुच्छ लेखू नकोस,
तर दयेने
माझे म्हणणे ऐक आणि मला उत्तर दे.