तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत असता,
तेव्हा मला आनंद होतो.
या वेळेचा उपयोग माझी स्तुती करण्यासाठी आणि एकमेकांची प्रशंसा करण्यासाठी करा.
तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या सर्वांत जवळच्या माणसांशी
शांतीने राहावे, अशी माझी इच्छा आहे.
ही शांती तुम्ही कल्पना करता त्यापलीकडची आहे,
कारण तिचे स्वरूप तुम्ही
तुमच्या मानवी समजुती आणि नातेसंबंध यांच्या चौकटीत पाहता.
माझी शांती तुमच्या जाणिवांच्या, अपेक्षांच्या
आणि आकलनाच्या पलीकडची आहे.
मी तुम्हाला देतो ती शांती पूर्ण आहे, अर्धवट नाही.
मी तुम्हाला देतो ती शांती प्रकाश आहे, अंधार नाही.
मी तुम्हाला देतो ती शांती माझी आहे, तुमची नाही.
मी तुम्हाला जे देतो ते स्वीकारा,
आणि ही देणगी तुमच्या सर्वांत जवळच्या माणसांसाठी असू द्या.
तुम्हाला आशीर्वाद का मिळाला हे समजलेच पाहिजे असे नाही.
माझी शांती सोबत घ्या आणि ती इतरांच्या भल्यासाठी वापरा.
माझी शांती तुमच्यात बदल घडवेल आणि तुम्हाला बळ देईल.
माझी शांती तुम्हाला माझ्या जवळ आणेल.
ही शांती मागा.
भिऊ नका,
तुमच्यात दिसून येणाऱ्या बदलाला भिऊ नका.
भिऊ नका,
तुमच्यासोबत असणाऱ्यांना या शांतीत सहभागी करून घ्यायला भिऊ नका.
तुमच्याद्वारे हे घडवावे, अशी माझी इच्छा आहे.
मला तुमच्यात वास करू द्या.
तुमचे शब्द माझे शब्द होऊ द्या.
ज्यांना माझे शब्द ऐकण्याची गरज आहे, त्यांच्यापर्यंत ते तुमच्याद्वारे वाहत जातील.
मला तुमच्याद्वारे कार्य करू द्या. मला तुम्हाला आशीर्वाद देऊ द्या.
