तुमच्या जीवनातील घटनांमुळे असे प्रश्न निर्माण होतात
की ज्यांची उत्तरे देता येत नाहीत.
या प्रश्नांची उत्तरे आहेत, असा विश्वास ठेवा;
पण ती तुम्हाला दिसत नाहीत.
तुम्हाला सर्व काही समजणे महत्त्वाचे नाही;
महत्त्वाचा आहे तो केवळ तुमचा विश्वास आणि तुमची श्रद्धा.
म्हणून चांगुलपणावर विश्वास ठेवण्यावर लक्ष द्या.
शंका सोडून द्या आणि प्रश्न विचारत राहू नका,
कारण त्यांचा काही उपयोग नाही.
तुमची भीती बाजूला ठेवा
आणि मी ज्या रीतीने कार्य करतो, त्या रीतीचा खुल्या मनाने स्वीकार करा.
माझा चांगुलपणा कार्यरत आहे, असा विश्वास ठेवा,
माणसांच्या गोंधळातही.
माझा हात जीवनातील घटनांना दिशा देतो, असा विश्वास ठेवा.
असा विश्वास असेल,
तर मग कशाची काळजी करायची?
अशी श्रद्धा असेल,
तर मग हृदयात केवळ आनंद उरायला हवा.
जीवनातील ओझ्यांना तुमच्यावर सत्ता गाजवू देऊ नका.
ही ओझी उतरू द्या
आणि त्यांच्या जागी मनाला धीर लाभू द्या.
माझ्या शब्दांनी
तुमच्या हृदयाला उभारी मिळू दे आणि आनंद व शांती लाभू दे.
या देणग्यांनी
तुमचे हृदय समाधानाने भरून जाऊ दे.
