मी देतो त्या आशेशिवाय दुसरी कोणती आशा आहे?
दुसरे कोणते प्रोत्साहन आहे,
मी देतो ते प्रोत्साहन सोडून?
माझ्या प्रेमाहून अधिक सामर्थ्यवान प्रेम कोणते?
तुझ्या एका श्वासालाही अर्थ नाही
माझ्या मार्गदर्शनाशिवाय.
तुझ्या दिवसातील एक मिनिटही सार्थ ठरत नाही
मी तुला दिशा दाखवल्याशिवाय.
माझ्या मार्गाने चाल, म्हणजे तुला तुझी वाट दिसेल.
मी कशा रीतीने कार्य करतो ते जाणून घे, म्हणजे तुला कोणत्या दिशेने जायचे ते समजेल.
माझी वचने स्वीकार, म्हणजे तुला माझी योजना उमगेल.
असा एकही क्षण जात नाही
जेव्हा माझी नजर तुझ्यावर नसते.
मी सदैव तुझ्या अंतर्यामी आहे.
माझ्या सान्निध्याचा शोध घे
आणि जाणून घे की मी तुझ्यासोबत आहे.
माझे स्वरूप जाणून घे,
म्हणजे मी तुझी काळजी घेतो हे तुला कळेल.
माझ्या स्वरूपाने तुझा सारा वेळ व्यापून टाकू दे,
म्हणजे प्रत्येक दिवसागणिक तुला
तृप्ती आणि समाधान लाभेल.
