हे प्रभू, आम्ही तुझी आराधना करतो
हे खऱ्या देवा आणि खऱ्या मानवा, तू या पवित्र संस्कारात खरोखर उपस्थित आहेस.
हे प्रभू, आम्ही तुझी आराधना करतो
हे आमच्या तारणाऱ्या, आमच्यासोबत असणाऱ्या, विश्वासू आणि दयासंपन्न देवा,
हे प्रभू, आम्ही तुझी आराधना करतो
हे सृष्टीच्या व इतिहासाच्या राजा आणि प्रभू,
हे प्रभू, आम्ही तुझी आराधना करतो
हे पाप आणि मृत्यू यांवर विजय मिळविणाऱ्या,
हे प्रभू, आम्ही तुझी आराधना करतो
हे मानवजातीच्या मित्रा, पुनरुत्थित व जिवंत प्रभू, तू पित्याच्या उजवीकडे विराजमान आहेस.
हे प्रभू, आम्ही तुझी आराधना करतो
हे प्रभू, आम्ही तुझ्यावर श्रद्धा ठेवतो
हे पित्याच्या एकुलत्या पुत्रा, तू आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरलास.
हे प्रभू, आम्ही तुझ्यावर श्रद्धा ठेवतो
हे स्वर्गीय वैद्या, तू आमच्या दुःखात आमच्याकडे वाकतोस.
हे प्रभू, आम्ही तुझ्यावर श्रद्धा ठेवतो
हे वधिलेल्या कोकरा, आम्हाला दुष्टतेपासून वाचवण्यासाठी तू स्वतःचे अर्पण करतोस.
हे प्रभू, आम्ही तुझ्यावर श्रद्धा ठेवतो
हे उत्तम मेंढपाळा, तू आपल्या लाडक्या कळपासाठी स्वतःचा प्राण देतोस.
हे प्रभू, आम्ही तुझ्यावर श्रद्धा ठेवतो
तू जीवनाची भाकर आणि अमरत्वाचे औषध आहेस; तू आम्हाला शाश्वत जीवन देतोस.
हे प्रभू, आम्ही तुझ्यावर श्रद्धा ठेवतो
हे प्रभू, आम्हाला मुक्त कर
सैतानाच्या सत्तेतून आणि जगाच्या प्रलोभनांतून
हे प्रभू, आम्हाला मुक्त कर
तुझ्याविना आपण काहीही करू शकतो, या गर्वातून आणि फाजील आत्मविश्वासातून
हे प्रभू, आम्हाला मुक्त कर
भीती आणि चिंता यांमुळे होणाऱ्या फसवणुकीतून
हे प्रभू, आम्हाला मुक्त कर
अश्रद्धेतून आणि घोर निराशेतून
हे प्रभू, आम्हाला मुक्त कर
अंतःकरणाच्या कठोरपणातून आणि प्रेम करण्याच्या असमर्थतेतून
हे प्रभू, आम्हाला मुक्त कर
हे प्रभू, आम्हाला वाचव
मानवजातीला पीडणाऱ्या प्रत्येक अनिष्टापासून
हे प्रभू, आम्हाला वाचव
भुकेपासून, दुष्काळापासून आणि स्वार्थापासून
हे प्रभू, आम्हाला वाचव
आजारांपासून, साथींच्या रोगांपासून आणि आपल्याच बंधुभगिनींच्या भीतीपासून
हे प्रभू, आम्हाला वाचव
विध्वंसक उन्मादापासून, निर्दयी स्वार्थसाधनेपासून आणि हिंसेपासून
हे प्रभू, आम्हाला वाचव
फसवणुकीपासून, खोट्या माहितीपासून आणि सदसद्विवेकबुद्धीला आपल्या हेतूंसाठी वळवणाऱ्यांपासून
हे प्रभू, आम्हाला वाचव
हे प्रभू, आमचे सांत्वन कर
वाळवंटातून वाटचाल करणाऱ्या तुझ्या ख्रिस्तसभेचे रक्षण कर.
हे प्रभू, आमचे सांत्वन कर
भीतीने आणि क्लेशांनी ग्रासलेल्या मानवजातीचे रक्षण कर.
हे प्रभू, आमचे सांत्वन कर
एकाकीपणाने व्याकूळ झालेल्या आजारी आणि मरणासन्न लोकांचे रक्षण कर.
हे प्रभू, आमचे सांत्वन कर
समोरच्या अडचणींना तोंड देताना थकून गेलेल्या डॉक्टरांचे आणि आरोग्यसेवकांचे रक्षण कर.
हे प्रभू, आमचे सांत्वन कर
निर्णय घेण्याच्या जबाबदारीचे ओझे वाहणाऱ्या राजकीय नेत्यांचे आणि निर्णय घेणाऱ्यांचे रक्षण कर.
हे प्रभू, आमचे सांत्वन कर
हे प्रभू, आम्हाला तुझा आत्मा दे
कसोटीच्या घडीला आणि गोंधळातून सावरण्यासाठी
हे प्रभू, आम्हाला तुझा आत्मा दे
मोहाला सामोरे जाताना आणि आमच्या दुर्बलतेत
हे प्रभू, आम्हाला तुझा आत्मा दे
दुष्टता आणि पाप यांच्याविरुद्धच्या लढ्यात
हे प्रभू, आम्हाला तुझा आत्मा दे
जे खरोखर चांगले आहे त्याच्या आणि खऱ्या आनंदाच्या शोधात
हे प्रभू, आम्हाला तुझा आत्मा दे
तुझ्यात आणि तुझ्या मैत्रीत टिकून राहण्याचा निर्णय घेताना
हे प्रभू, आम्हाला तुझा आत्मा दे
हे प्रभू, आमची अंतःकरणे आशेसाठी खुली कर
पापाने आम्हाला जखडून टाकले तर
हे प्रभू, आमची अंतःकरणे आशेला खुली कर
द्वेषाने आमची अंतःकरणे बंद झाली तर
हे प्रभू, आमची अंतःकरणे आशेला खुली कर
आमच्यावर दुःख ओढवले तर
हे प्रभू, आमची अंतःकरणे आशेला खुली कर
उदासीनतेने आम्हाला व्याकूळ केले तर
हे प्रभू, आमची अंतःकरणे आशेला खुली कर
मृत्यूने आम्हाला ग्रासले तर
हे प्रभू, आमची अंतःकरणे आशेला खुली कर
कोविड-१९ च्या साथीच्या काळात पोप फ्रान्सिस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रार्थनाविधीत ही सुंदर प्रार्थना म्हटली गेली. ती पुढील स्रोतावर उपलब्ध आहे:
https://www.vaticannews.va/en/pope/news/2020-03/litany-supplication-urbi-et-orbi-pope-francis.html