मराठी

कुटुंबांसाठी प्रार्थना

हे प्रेमळ आणि दयाळू परमेश्वरा, आमच्या पित्या, सर्व कुटुंबांना एकत्र आण आणि प्रेमाने व परस्परांच्या आधाराने त्यांच्यात पूर्ण ऐक्य नांदू दे.

कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती आणि एकमेकांविषयी आपुलकी रुजव.

भांडणे आणि कटुता त्यांच्यापासून दूर ठेव. कधी त्यांच्या हातून चुका झाल्या तर त्यांच्यात क्षमाशीलता आणि शांती नांदू दे.

आईवडिलांचे एकमेकांवरील प्रेम आणि आपुलकी सर्वांसाठी चांगला आदर्श ठरो.

मुलांच्या मनात स्वाभिमान रुजव, जेणेकरून ती इतरांचा आदर करतील आणि समंजसपणे स्वतःच्या पायांवर उभी राहायला शिकतील.

कुटुंबांतील परस्परांची आपुलकी आणि आदर हे या जीवनात आणि परलोकात ख्रिस्ती जीवनाचे चिन्ह ठरो. आमचा प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे ही विनंती करतो.

आमेन.


आणखी प्रार्थना

दैनंदिन चिंतन