हे प्रभू, आमच्या देवा, तूच सर्व राष्ट्रांचा परमपवित्र राजा आणि अधिपती आहेस.
हे प्रभू, हे दैवी राजा, तुझ्याकडून दया, शांती, न्याय आणि सर्व चांगल्या गोष्टी मिळतील, अशा मोठ्या आशेने आम्ही तुझी प्रार्थना करतो.
हे प्रभू, आमच्या राजा, आमच्या कुटुंबांचे आणि आमच्या जन्मभूमीचे रक्षण कर.
हे परमविश्वासू प्रभू, आमचे रक्षण कर, अशी आम्ही तुला विनंती करतो.
आमच्या शत्रूंपासून आणि तुझ्या न्याय्य निवाड्यापासून आमचे रक्षण कर.
हे सार्वभौम राजा, तुझ्याविरुद्ध आम्ही केलेल्या पापांची आम्हाला क्षमा कर.
हे येशू, तू दयेचा राजा आहेस.
आम्ही तुझ्या न्याय्य निवाड्यास पात्र ठरलो आहोत
हे प्रभू, आमच्यावर दया कर आणि आम्हाला क्षमा कर.
तुझ्या अपार दयेवर आमचा भरवसा आहे.
हे परमप्रतापी राजा, आम्ही तुझ्यासमोर नतमस्तक होऊन प्रार्थना करतो;
पृथ्वीवर तुझे राज्य आणि तुझे राजेपण मान्य केले जावो.
आमेन.