तुम्हाला कोणता प्रकाश दिसतो,
जेव्हा तुम्ही अजून माहीत नसलेली उत्तरे शोधता?
तुम्हाला जितके समजून घ्यावेसे वाटते,
तितके तुमच्या उत्तरांतून समजत नाही का?
विचारमंथन आणि अस्वस्थता यांमुळे
तुम्ही गोंधळून जाता का?
सर्वप्रथम हे मान्य करा की
जीवनातील प्रश्न सोडवणे तुमच्या आवाक्याबाहेर आहे.
तुमच्याकडून फार थोडीच अपेक्षा आहे,
हे समजून घ्या.
तुम्ही जड ओझे वाहत असाल,
तर ते खाली ठेवा.
माझा प्रकाश ओळखताना
त्याला तुम्हाला उभारी देऊ द्या.
त्याच्या उबेचा आणि कृपेचा आनंद घ्या.
त्याचा तुमच्यावर जो ठसा उमटतो, त्यातून धीर घ्या.
तुम्हाला अजून जे उमगलेले नाही,
त्याची जाणीव माझ्या प्रकाशाने तुमच्या अंतःकरणात भरू द्या.
हे घडू द्या.
यासाठी प्रार्थना करा.
हे घडेल अशी अपेक्षा ठेवा.
