जेव्हा तुम्ही दिशा आणि मार्गदर्शनासाठी
माझ्याकडे वळता,
तेव्हा मी तुम्हाला उत्तर देईन.
मी तुम्हाला आशीर्वाद म्हणून जी उत्तरे देईन, ती कोणती असतील याचा आधीच अंदाज बांधू नका.
त्या संकेतांकडे आणि प्रभावांकडे लक्ष द्या,
ज्यांची तुम्हाला अपेक्षा नव्हती.
वारंवार प्रार्थना करा;
त्यामुळे तुम्हाला
सत्य काय आहे हे ओळखता येईल.
प्रमाणाबाहेर प्रतिक्रिया देऊ नका,
कारण मी त्यांच्यावर दबाव आणत नाही,
जे माझे मार्गदर्शन मागतात
आणि योग्य दिशा मिळावी म्हणून माझ्याकडे वळतात.
तुम्ही मला तसे करू दिले, तर मी तुमच्या जीवनाला दिशा देईन.
