जगाच्या रीतीभातींचा,
जग तुला काय शिकवते आणि तुला कशा प्रकारे मोह होतो याचा विचार करताना,
माझी शिकवण आणि माझ्या इच्छा वेगळ्या आहेत, हे लक्षात ठेव.
मी तुला एक मार्ग दिला आहे.
तू मागितलीस तर मी तुला कृपा देईन,
जेणेकरून तुला या मार्गाने चालता येईल.
मी तुझ्यावर बळजबरी करणार नाही.
मी इतरांच्या माध्यमातून तुला जे शब्द सांगतो,
त्यांवर विचार करण्यास तयार राहा.
त्या शब्दांत तुला एक समान धागा दिसेल,
आणि तू आपल्या सुज्ञपणाने
माझ्या मार्गाने चालशील.
हा मार्ग तुला माझ्यापर्यंत घेऊन येईल.
मी माझ्या शब्दांनी आणि सूचना देऊन
तुला मार्गदर्शन करीन.
हे मार्गदर्शन मी तुला
माझ्याकडून एक देणगी म्हणून देतो.
कोणत्या वाटेने जायचे ते मी तुला दाखवीन,
कारण तू कोणत्या वाटेने जावे अशी माझी इच्छा आहे,
हे तुला नेहमीच स्पष्टपणे ओळखता येत नाही.
तू माझे मार्गदर्शन मागशील,
तेव्हा मी तुझ्यासाठी हे करीन.
तुझ्यासमोर अनेक वाटा आहेत,
आणि त्यांपैकी कोणतीही वाट तू निवडू शकतोस.
मी तुझ्यासाठी आखलेली योजना पूर्ण करण्यासाठी
तुला ज्या देणग्यांची गरज भासेल,
त्या मी तुला देईन.
माझे लेकरू हो;
मी ज्या देणग्या देण्यास उत्सुक आहे, त्या ज्यांना हव्या आहेत,
त्यांना शांती आणि आनंद देण्यास मला मदत कर.
तू माझ्यासाठी हे करशील तेव्हा,
तुला अशी शांती आणि असे समाधान अनुभवायला मिळेल,
जे मानवी स्वप्नांचे वर्णन करणाऱ्या कविता आणि लेखनात
चित्रित केलेल्या शांती आणि समाधानापेक्षा वेगळे असेल.
माझ्या शांतीमुळे तुझ्यासाठी पुढे काय आहे, हे तुला समजेल.
