मराठी

आगमनकाळासाठी मुलांची प्रार्थना

झोपण्यापूर्वी किंवा रविवारच्या मिस्सापूर्वी आपल्या मुलांसोबत ही प्रार्थना करा.

माझ्या बालप्रभू येशू, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि या आगमनकाळासाठी मी तुझे आभार मानतो. तू माझ्यासाठी जे काही केलेस, ते मला समजून घेण्यास मदत कर. तुझ्या प्रेमळ आईने तुला आपल्या हृदयात जपले आणि या जगात आणले. मलाही तसेच करण्यास मदत कर.

 माझ्या प्रेमळ येशू, या आगमनकाळात माझा राजा आणि माझा देव म्हणून मी तुझी निवड करतो. मला तुझ्या जवळ घे आणि माझी पापे ओळखण्यास मला मदत कर, म्हणजे तुला माझ्यात जे बदल हवे आहेत ते मला करता येतील. 

मरिया माते, या आगमनकाळात माझ्यासाठी प्रार्थना कर, म्हणजे देवाला माझ्याकडून जे काही हवे आहे ते सर्व मला करता येईल. देवाने तुला जे काही करायला सांगितले, त्या सर्वाला तू “हो” म्हणालीस. मलाही तसेच करता यावे म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर.

ये, प्रभू येशू,

ये, प्रभू येशू,

ये, प्रभू येशू, ये!

येशू, माझे तुझ्यावर प्रेम आहे.

आमेन.