
हे ख्रिस्त येशू,
जेव्हा सर्वत्र अंधार दाटतो
आणि मला माझ्या दुर्बलतेची व असहायतेची जाणीव होते,
तेव्हा मला तुझ्या सान्निध्याची,
तुझ्या प्रेमाची आणि तुझ्या सामर्थ्याची जाणीव होऊ दे.
मला पूर्ण भरवसा ठेवायला मदत कर
तुझ्या रक्षण करणाऱ्या प्रेमावर
आणि मला बळ देणाऱ्या तुझ्या सामर्थ्यावर,
म्हणजे कशाचीही भीती किंवा चिंता मला वाटणार नाही,
कारण तुझ्या सान्निध्यात जगताना,
मला तुझा हात दिसेल,
आणि प्रत्येक गोष्टीत तुझा हेतू व तुझी इच्छा मला उमगेल.
आमेन.
लोयोलाचे संत इग्नेशियस यांनी रचलेली प्रार्थना
हे पान शेअर करा:
