मराठी

आजच तू माझ्याबरोबर असशील

तुझ्या उजव्या बाजूला मी वधस्तंभावर लटकत होतो,
तुझा प्रत्येक शब्द कान देऊन ऐकत होतो.
तुझी जीभ टाळूला चिकटली होती,
तरीही तुझा आवाज मला ऐकू येत होता.

त्यांच्यासाठी तू क्षमा मागितलीस,
त्यांची बाजू घेण्याची एकही संधी सोडली नाहीस.
तुझ्या नम्र, सौम्य हृदयाने
अपमानाला प्रत्युत्तर दिले नाही.

तेव्हा माझ्या मनात आले, “मीही
क्षमा मागितली तर?”
पण माझे सारे अपराध आठवताच
माझा श्वास कोंडला, शब्द फुटेना.

इतके काही करूनही मी,
तू हात पसरून माझे स्वागत केलेस,
आणि दयेने विचारलेस:
“अजूनही माझ्यापासून दूर पळतोस?

“तुझ्या वेदना मी सोसल्या,
तुझा वधस्तंभ खांद्यावर घेतला,
पण तुझे प्रेम मिळवण्याचा माझा प्रयत्न व्यर्थ ठरला,
तेव्हा तुला गमावल्याचे दुःख मला झाले.

“आता भरपाई म्हणून
तू मला एवढेच देऊ शकतोस:
आज माझ्याशी एकनिष्ठ राहा,
आणि आपण मित्र होऊ.”

“हे येशू, माझी आठवण ठेव!”
अंतःकरणाच्या तळातून मी अशी हाक देतो.
“आजच तू माझ्याबरोबर असशील,
आणि यापुढे तुला कधीही मृत्यू येणार नाही.”

-फा. टिमथी जे. ड्रेपर

आणखी कविता

पवित्र सप्ताह आणि पुनरुत्थान पर्वाच्या प्रार्थना