निराशेपासून स्वतःला जप,
कारण ती तुला चुकीच्या वाटेवर नेईल.
त्याऐवजी आशा बाळग
आणि चांगले घडेल अशी अपेक्षा ठेव.
निराशेच्या विचारांना तुला घेरू देऊ नकोस.
तू निराशेच्या विळख्यात असशील,
तर तिला झटकून टाक
आणि माझ्या रक्षण करणाऱ्या कृपेचे कवच धारण कर.
रक्षण करणाऱ्या या कृपेचे सामर्थ्य कवचासारखे धारण कर.
तुझ्या शत्रूला सामोरे जाताना हे कवच अंगावर असू दे.
तुला इजा झाली तर,
माझ्या कृपेला तुझ्या जखमा भरून काढू दे.
हे संरक्षण तुझ्या जीवनाचा भाग होऊ दे,
म्हणजे कोणतीही भीती तुझ्यावर मात करू शकणार नाही.
तुला पार करता येणार नाही असा कोणताही अडथळा नाही.
कोणताही पराभव तुला खचवू शकणार नाही.
माझ्या संरक्षणाने तुला नवे धैर्य लाभू दे,
कारण कोणतेही संकट तुला गिळंकृत करू शकणार नाही.
माझ्या संरक्षणाने तुझ्या मनाला उभारी मिळू दे
आणि माझ्या कृपेची तुला प्रत्यक्ष अनुभूती येऊ दे.
