पवित्र शास्त्रवाचन: योहान 20:19–23
संदर्भ: थोमाशिवाय सर्व शिष्य एकत्र जमले होते. हे ईश्वरी योजनेनुसार घडले, हे आपण पुढील ध्यानात पाहू.
लक्षात घ्या की तो अजूनही ईस्टर रविवारच होता, म्हणजे पुनरुत्थानाचा दिवस. शिष्य ‘भीतीने’ एकत्र जमले होते, हेही लक्षात घ्या. त्यांना आपल्या जिवाची भीती होती. येशूंवर जे ओढवले, तेच लवकरच आपल्यावरही ओढवेल, अशी त्यांना भीती वाटत होती. अशा भीतीच्या वातावरणात येशू त्यांना दर्शन देतात.
येशूंच्या शब्दांवर आणि कृतींवर मन लावून ध्यान करावे. “तुम्हांला शांती असो,” असे ते म्हणाले. मग त्यांनी शिष्यांना आपल्या पवित्र जखमा दाखवल्या. त्या क्षणी आनंदाने भीतीचा अंधार भेदला आणि तिचे जड ओझे दूर केले. येशूंनी सोसलेल्या प्राणघातक जखमाही त्यांच्या कार्याला रोखू शकल्या नाहीत, हे पाहण्याचा तो आनंद होता.
येशूंनी शिष्यांना आपली शांती दिली आणि त्याच वेळी त्यांना पवित्र आत्माही दिला. या देणगीबरोबरच पापांची क्षमा करण्याचे आपले कार्य पुढे चालू ठेवण्याची जबाबदारीही त्यांनी त्यांच्यावर सोपवली. पित्याने तारण घडवून आणण्यासाठी पुत्राला जगात पाठवले होते. आता येशू आपल्या नव्या प्रेषितांना, म्हणजे आपल्या पहिल्या याजकांना, संस्काराद्वारे पापांची क्षमा करण्याच्या कृतीत प्रत्यक्ष आणि वैयक्तिक रीतीने सहभागी होण्यास आमंत्रण देत होते.
या ध्यानात विशेषतः समेटाच्या संस्कारावर लक्ष केंद्रित करावे. या संस्कारात खरोखरच देवाच्या सामर्थ्याने पापांची क्षमा होते.
मनन: ध्यान आणि चिंतनाच्या ज्या पद्धतींची तुम्हाला ओळख झाली आहे, त्या वापरून योहान 20:19–23 या उताऱ्यावर प्रार्थनापूर्वक मनन करा.
प्रमुख चित्र: पुनरुत्थित ख्रिस्त आपल्या शिष्यांना दर्शन देताना, लुका सिन्योरेली
- येशूचे पुनरुत्थान आणि पहिले दर्शन
- दुसरे दर्शन
- तिसरे दर्शन
- चौथे दर्शन
- पाचवे दर्शन
- सहावे दर्शन
- सातवे दर्शन
- आठवे दर्शन
- नववे दर्शन
- इतर दर्शने
- येशूचे स्वर्गारोहण
- दैवी प्रेम प्राप्त करण्यासाठी चिंतन
