मराठी

देवदूताची प्रार्थना

प्रमुख – प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला.

प्रतिसाद – आणि पवित्र आत्म्याद्वारे तिला गर्भधारणा झाली.

(नमो मरिये….)

प्रमुख – पाहा, मी प्रभूची दासी आहे.

प्रतिसाद – तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या बाबतीत घडो.

(नमो मरिये….)

प्रमुख – आणि शब्द देहधारी झाला.

प्रतिसाद – आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली.

(नमो मरिये….)

प्रमुख – हे देवाच्या पवित्र माते, आमच्यासाठी प्रार्थना कर.

प्रतिसाद – जेणेकरून आम्ही ख्रिस्ताच्या वचनांना पात्र ठरू.

 
आपण प्रार्थना करूया:
हे प्रभू, आम्ही तुला विनवितो, तुझी कृपा आमच्या अंतःकरणांत ओत;
तुझा पुत्र ख्रिस्त याने देह धारण केला, हे ज्या आम्हाला
देवदूताच्या संदेशाद्वारे कळविण्यात आले,
त्या आम्हाला त्याच्या दुःखसहनाद्वारे आणि क्रुसाद्वारे
त्याच्या पुनरुत्थानाच्या गौरवापर्यंत पोहोचव
— त्याच आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे. 

आमेन.


आणखी प्रार्थना

दैनंदिन चिंतन