
रात्रोनरात्र,
थंडीने आणि भीतीने कुडकुडत,
मी कोळशाच्या शेकोटीजवळ उभा होतो,
आणि तिथे शेक घेताना
मी शिव्याशाप दिले, शपथा घेतल्या,
आणि मी खोटारडा ठरलो.
“तू गालीलहून आलेला
तोच ना?
त्या परम नम्र येशूचा मित्र?”
कोंबडा आरवला.
“तुम्ही ज्याच्याविषयी बोलता,
त्या माणसाला मी ओळखत नाही.”
पण तेव्हा त्यांनी वळून पाहिले,
आणि त्यांच्या नजरेने
माझ्या अंतरी ज्योत पेटली,
तेव्हा मी रडलो,
मोडलेल्या शपथांसाठी
आणि माझ्या साऱ्या कोमट भक्तीच्या दिवसांसाठी.
त्यांची न्यायचौकशी होत असताना
मी त्यांना नाकारले
आणि त्या परीक्षेत कमी पडलो,
त्यांच्यासोबत मरण पत्करीन,
असे वचन दिले होते तरी
पुढेही प्रत्येक प्रसंगी मी त्यांना साथ देण्यात कमी पडलो.
मनात पश्चात्ताप,
हाती रिकामी जाळी,
घेऊन मी पुन्हा मासेमारीकडे वळलो.
पण पहाट झाली तेव्हा,
कोळशाची शेकोटी पेटलेली असताना,
त्यांनी मला नावाने हाक मारली.
आता किनाऱ्यावर
ते मला पुन्हा विचारतात,
मी त्यांचा मित्र होईन का,
आणि वाळूवर उभे राहून,
आपल्या विंधलेल्या हातांनी
ते आपली मेंढरे माझ्या देखरेखीला सोपवतात.
-फा. टिमथी जे. ड्रेपर
पवित्र सप्ताह आणि पुनरुत्थान पर्वाच्या प्रार्थना
मुख्य चित्र: यान व्हान दे व्हेने, सार्वजनिक वापरासाठी मुक्त, विकिमीडिया कॉमन्समार्फत
