प्रत्येक दिवस माझ्या उपस्थितीची चाहूल घेऊन येतो.
माझ्या उपस्थितीच्या या खुणा शोधा.
तुमच्या दैनंदिन जीवनात माझी उपस्थिती ओळखा.
मी तिथेच आहे, तुम्हाला सापडण्यासाठी.
या घटना तुमच्या मनात श्रद्धा जागवतील.
त्या शोधा, त्या पाहा आणि त्यांचा आनंद घ्या.
या घडामोडींतून मी तुम्हाला खात्री पटवून देतो
की सर्व गोष्टींत मी उपस्थित आहे.
तुमची श्रद्धा हरवली असेल तेव्हा,
दररोज माझी उपस्थिती शोधा
आणि तुम्हाला जे उमगेल त्यावर विश्वास ठेवा.
तुमच्या मनात शंका असतील तेव्हा,
माझ्या कृतींवर भरोसा ठेवा
आणि मी तुमच्यासोबत आहे अशी श्रद्धा बाळगा.
तुम्ही निराशेत हरवून जाल तेव्हा,
माझ्या उपस्थितीतून आशा मिळवा,
कारण तिच्यामुळे तुम्हाला माझ्या चांगुलपणाची खात्री पटेल.
हे करा, म्हणजे तुमची दृष्टी माझ्या दृष्टीसारखी होईल.
तुमची आशा माझ्या चांगुलपणावर स्थिर होईल,
आणि कोणत्याही आघातासमोर तुमची श्रद्धा टिकून राहील.
