मराठी

मी विश्रांती घेतली तर चालेल का?

मी विश्रांती घेतली तर चालेल का?
काम पूर्ण झालं नाही, पण मी माझ्या परीने शक्य ते सारं केलं.
काम अर्धवट राहिलं, याची मला लाज वाटते,
आणि दोष माझ्यावर येईल, अशी भीतीही वाटते.

डोळे मिटून माझ्या मातेची अंगाई ऐकावी,
अशी मला किती आस लागली आहे!
पण माझ्या चुकीमुळे काही बिघडलं,
तर तिची अंगाई ऐकण्यास मी पात्र आहे का?

ती दयाळू आहे, यावर माझा विश्वास आहे,
आणि ती माझं अंतःकरण समजून घेते.
मग त्या प्रेमात मला सत्य सापडेल का,
की माझ्या चिंतेवरच मी भरवसा ठेवावा?

कुशीवरून कुशीवर वळत, तो विचार शांत करू पाहतो:
‘तू कधीच तुझ्या परीने शक्य ते सारं केलं नाहीस.’
पण ज्या गोष्टींचा मला पश्चात्ताप आहे, त्या पुन्हा आठवतात,
आणि माझी काळजी आणखी वाढते.

मी माझी बाजू सावरू पाहतो,
मी असं का केलं, याची सगळी कारणं पुन्हा मोजतो.
पण कितीही तथ्यं मांडली तरी
आता पुरत्या जाग्या झालेल्या माझ्या शंका मिटत नाहीत.

म्हणून मी मातेकडे प्रार्थना करतो आणि वाट पाहतो,
जोवर माझी चिंता खूप उशिरापर्यंत जागून
काहीही वाद न घालता झोपी जाते,
आणि मी स्वतःला सोपवून विसावतो.