मराठी

संत आंद्रेय यांची नाताळची नोव्हेना

संत आंद्रेय यांच्या नाताळच्या नोव्हेनेची खाली दिलेली प्रार्थना परंपरेनुसार ३० नोव्हेंबरला, संत आंद्रेय यांच्या सणापासून, नाताळच्या पूर्वसंध्येपर्यंत दररोज १५ वेळा म्हटली जाते.

बेथलेहेमच्या गोठ्यात, कडाक्याच्या थंडीत, मध्यरात्री परमपवित्र कुमारीच्या पोटी देवपुत्राचा जन्म झाला, ती घटका आणि तो क्षण वंदनीय व धन्य असोत. त्या घटकेला माझ्या प्रार्थना ऐकून माझ्या इच्छा पूर्ण कराव्यास, अशी मी तुला कळकळीची विनंती करतो.

(तुमचे प्रार्थनेचे हेतू येथे सांगा)

येशू ख्रिस्त आणि त्याची परमधन्य माता यांच्या मध्यस्थीने.

आमेन


आगमनकाळासाठी आणखी साहित्य