नाताळच्या तयारीसाठी 17–23 डिसेंबर या 7 दिवसांत ‘हे’ प्रतिगीते प्रार्थनेत म्हटली जातात. ज्यांना प्रहरप्रार्थनेचा परिचय आहे, त्यांना ही प्रतिगीते दररोज मारियेच्या स्तुतिगीतासोबत म्हटली जातात हे माहीत असेल. ही प्रतिगीते यशयाच्या भविष्यवाण्यांवर आधारलेली आहेत आणि मशीहाला दिलेल्या विविध उपाधी उलगडून दाखवतात.
ओ सापिएन्तिया (हे ज्ञानस्वरूपा) यशया 11:2–3; 28:29
ओ अदोनाय (हे प्रभू) यशया 11:4–5; 33:22
ओ रादिक्स येस्से (हे यिशयाच्या मुळा) यशया 1:1; 11:10
ओ क्लाविस दाविद (हे दावीदाच्या किल्ली) यशया 9:6; 22:22
ओ ओरिएन्स (हे उगवत्या सूर्या) यशया 9:1
ओ रेक्स जेन्तिउम (हे राष्ट्रांच्या राजा) यशया 9:5; 2:4
ओ इम्मानुएल (देव आमच्याबरोबर) यशया 7:14
प्रत्येक प्रतिगीत लहान आहे. त्यामुळे नाताळ जवळ आला असताना आध्यात्मिक तयारीसाठी दररोज थोडा वेळ ते वाचणे, त्यावर मनन करणे आणि दिवसभर ते चिंतनपूर्वक प्रार्थनेत म्हणणे उपयुक्त ठरते.
17 डिसेंबर
हे आमच्या सर्वोच्च देवाच्या ज्ञानस्वरूपा,
तू सामर्थ्याने आणि प्रेमाने सृष्टीला मार्ग दाखवतोस:
ये आणि आम्हाला ज्ञानाचा मार्ग शिकव!
+++
18 डिसेंबर
हे इस्राएलच्या घराण्याच्या नेत्या,
तू सीनाय पर्वतावर मोशेला नियमशास्त्र दिलेस:
ये आणि तुझ्या प्रबळ सामर्थ्याने आमची सुटका कर!
+++
19 डिसेंबर
हे यिशयाच्या खोडाच्या मुळा,
देवाचे त्याच्या सर्व लोकांवर असलेल्या प्रेमाचे चिन्हा:
विलंब न करता ये आणि आमचे तारण कर!
+++
20 डिसेंबर
हे दावीदाच्या किल्ली,
तू देवाच्या शाश्वत राज्याचे दरवाजे उघडतेस:
ये आणि अंधाराच्या कैद्यांना मुक्त कर!
+++
21 डिसेंबर
हे तेजस्वी पहाटे,
शाश्वत प्रकाशाच्या तेजा, न्यायाच्या सूर्या:
ये आणि अंधारात व
मृत्यूच्या छायेत राहणाऱ्यांवर प्रकाश टाक.
+++
22 डिसेंबर
हे सर्व राष्ट्रांच्या राजा आणि ख्रिस्तसभेला एकत्र बांधून ठेवणाऱ्या कोनशिले:
ये आणि तू मातीतून घडवलेल्या मानवाचे तारण कर!
+++
23 डिसेंबर
हे इम्मानुएला, आमच्या राजा आणि नियमशास्त्र देणाऱ्या,
हे प्रभू, आमच्या देवा, ये आणि आमचे तारण कर!
+++
