मराठी

संयम

प्रत्येक दिवसात क्षणोक्षणी तुमच्या संयमाची परीक्षा होते,
  ती जीवनातल्या संघर्षांमुळे.
या परीक्षांना आशेने आणि शांत चित्ताने सामोरे जा.

तुमच्या मनःशांतीचा प्रकाश कोणत्याही संघर्षात पडू द्या.
तुम्ही कसोटीवर मात करावी म्हणून तुमच्या चारित्र्याची परीक्षा होते.

या काळात तुमच्या आशांना नवी उभारी मिळू द्या
  आणि तुमची स्वप्ने उजळू द्या.
या संघर्षालाही आनंदाने सामोरे जा,
  कारण तो तुमच्या जडणघडणीसाठी निर्माण झाला आहे.
त्याच्या काळोख्या सावलीपुढे हार मानू नका.
तुमचे संपूर्ण अस्तित्व माझ्या प्रकाशात आणा.

या प्रकाशाने तुमच्या आत्म्याला उभारी मिळू द्या
  आणि तुमचे अंतःकरण भरून जाऊ द्या
  नव्या स्वप्नांनी, नव्या आशांनी आणि नव्या शांततेने.
या देणग्यांचे लाभ आपलेसे करा,
  कारण त्या का दिल्या किंवा देणे कसे योग्य ठरते,
  याची चिंता तुम्हाला करण्याची गरज नाही.

मी तुम्हाला जे देतो, ते माझी देणगी म्हणून स्वीकारा.
माझ्या देणग्यांची फळे
  तुमच्या अंतर्यामी विसावू द्या.
या फळांचा प्रकाश
  तुमच्या आत्म्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचू द्या.

पुढील चिंतन

अनुक्रमणिका