मराठी

मला परवानगी दे

तुझा मार्ग तुला माझ्याकडे आणतो.
तुझ्या मुखातून माझी स्तुती होते.
तुझी नजर माझ्याकडे लागली आहे.

मी तुझ्या विनवण्या ऐकतो.
मी तुझे प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो.
मी तुझ्या गरजा पूर्ण करतो.

माझ्या मार्गावर शांत मनाने चाल.
या मार्गाची दिशा स्वीकार,
  कारण तो इतरांना माझ्याकडे आणतो.

आयुष्यात पुढे काय आहे, हे कळण्याची तू वाट पाहत आहेस.
माझा हात तुझ्या सोबतीला आहे, हे तुला दिसेल, हे लक्षात ठेव.

तुझ्या परिस्थितीत माझी इच्छा स्वीकार,
  कारण त्यातून मला जे हवे आहे ते घडते.

मन शांत ठेव आणि तुझे हृदय माझ्याकडे घेऊन ये.
गरज असेल तेव्हा मला तुझ्याद्वारे कार्य करू दे.

पुढील चिंतन

अनुक्रमणिका