माझा एक भाग व्हा
तुमच्या कृतींतून.
प्रत्येक दिवस तुम्हाला एक नवी संधी देतो,
मी जसा जगलो तसा तो दिवस जगण्याची.
तुम्हाला लाभलेला प्रत्येक दिवस स्वीकारा
आणि तो असा जगा की तुमच्या कृती
माझ्या त्या वचनांवर केंद्रित असतील,
जी मी तुमच्याआधी होऊन गेलेल्यांना दिली.
तुमच्याआधी होऊन गेलेल्यांनी
घालून दिलेल्या आदर्शांप्रमाणे जगा.
तुमच्या सभोवतालच्या अशा लोकांचे ऐका,
जे मला केंद्रस्थानी ठेवून कृती करतात.
त्या सत्याचा एक भाग व्हा—
ते सत्य मीच आहे.
प्रत्येक दिवस तुम्हाला माझ्या अधिक जवळ आणेल,
जर तुम्ही अशा रीतीने जगलात.
सत्याचे बालक व्हा.
असे बालक व्हा,
ज्याचा शोध पूर्ण झाला आहे.
माझा शोध घ्या,
आणि मी तुम्हाला सापडेन.
शोधा, आणि तुम्हाला उलगडा होईल.
विचारा, आणि मी तुमच्याबरोबर असेन.
तुम्हाला माझे मार्ग दिसतील आणि माझी ओळख पटेल.
तुमच्या शंका तुम्हाला आंधळे करतील,
आणि तुमचा अविश्वास तुम्हाला
भलत्याच दिशांना नेईल.
या अडथळ्यांमुळे वाट चुकू देऊ नका.
माझा शोध घ्या.
शोधा, आणि तुम्हाला सापडेल.
विचारा, आणि तुम्हाला कळेल.
