जसा सूर्याचा प्रकाश पृथ्वीला उब देतो,
तशीच मी तुझ्या हृदयाला उब देईन.
वेदनेच्या काळात मी तुझे सांत्वन करीन.
गोंधळाच्या वेळी मी तुला सुज्ञपणा देईन.
निराशेच्या काळात मी तुला आशा देईन.
वेदनेच्या काळात मी तुला दिलासा देईन.
अन्याय होईल तेव्हा मी तुझा राग शांत करीन.
छळाच्या काळात मी तुझे रक्षण करीन.
तेव्हा तू कसलीही चिंता करू नकोस,
कारण मी तुझी काळजी घेत आहे.
तुझ्या मनात कोणतीही भीती वाढू देऊ नकोस,
कारण मी तुला दिलेली वचने नक्की पूर्ण करीन.
