ज्यांना तुमच्या मदतीची गरज आहे, त्यांच्या मदतीला धावून जा.
स्वतःला इतरांपेक्षा
श्रेष्ठ समजू नका.
कोणाला तुमच्या काळजीची, समजूतदारपणाची
आणि सुज्ञतेची गरज आहे, हे ओळखा.
ही दाने तुम्हाला दिली जातील,
जशी इतरांना त्यांची गरज भासेल.
एकमेकांवर कसे प्रेम करायचे, याची योजना आखू नका,
कारण माझ्या वचनात मी तुम्हाला याविषयी सांगितले आहे.
माझे वचन समजून घ्या
आणि इतरांना शांती द्या.
इतरांच्या कोणत्या गरजा तुम्ही पूर्ण करू शकता, हे पाहा,
आणि त्यासाठी मी तुम्हाला दिलेली कौशल्ये व दाने वापरा.
अशा रीतीने स्वतःला सेवेसाठी वाहून
माझा गौरव करा.
ज्यांना तुमची गरज आहे, त्यांची काळजी घ्या;
तुम्हाला जमेल तशी त्यांना माझी शांती द्या.
मी ज्यांना तुमच्या वाटेवर आणीन,
त्यांच्यासाठी हे करायला मी तुम्हाला मदत करीन.
