मराठी

बदल

स्वतःला नव्याने घडवा,
  कारण पुढे जे तुमची वाट पाहत आहे,
  त्यासाठी हा बदल तुम्हाला तयार करील.
हा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा,
  कारण उशीर केल्याने तुम्ही
  माझ्या अधिक जवळ येणार नाही.
बदलांना घाबरू नका,
  कारण तुम्हाला काहीही अपाय होणार नाही.

माझ्यावर विश्वास ठेवा;
  या बदलाच्या काळात
  मी तुमची काळजी घेईन.

माझा आत्मा तुम्हाला उभारी देईल,
  तुम्हाला प्रकाश देईल आणि अनेक प्रकारे
  तुमच्यावर उतरेल, अशी आशा बाळगा.

स्वतःला समर्पित करा.
पित्याला याहून मोठी भेट देता येणार नाही.
जे आपले मन आणि हृदय
  मला समर्पित करतात, त्यांना
  अनेक आशीर्वाद मिळतील.
तुम्हाला शांती लाभेल;
  आजवर न अनुभवलेला आनंद तुम्हाला व्यापून टाकेल.
स्वतःला समर्पित करा,
  कारण या समर्पणाने
  तुम्ही माझ्या राज्यात प्रवेश कराल.
तुम्हाला माझे वचन समजेल
  आणि तुमच्या सभोवती माझे सान्निध्य दिसेल.
स्वतःला समर्पित करण्यास उशीर करावा,
  अशी अनेक कारणे तुम्हाला सापडतील.

उशीर करण्यात कसला शहाणपणा आहे?
माझ्याशिवाय तुम्हाला काय लाभ होऊ शकतो?
माझ्या आत्म्याचे मार्गदर्शन नसताना तुम्हाला कोणता दिलासा मिळेल?
माझ्याशिवाय तुम्ही कोणती ध्येये गाठली आहेत?
माझ्याशिवाय तुम्ही काय आहात, हे पाहा,
  आणि मग माझा आत्मा तुमच्यात असताना
  तुम्ही काय आहात, हे ओळखा.
मला तुमच्या अस्तित्वाचा भाग होऊ द्या,
  मग तुम्ही मला ओळखाल.
स्वतःला समर्पित करा,
  आणि मी दररोज तुमच्यासोबत असेन.

पुढील चिंतन

अनुक्रमणिका