
हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
संत मारिया फॉस्टिना कोवाल्स्का यांची दैनंदिनी, नोंद क्र. 949
+
JMJ 12 फेब्रुवारी 1937
+देवाचे प्रेम हे फूल, तर दया हे त्याचे फळ.
ज्याच्या मनात शंका आहे, त्या जीवाने दैवी दयेवरील ही चिंतने वाचावीत आणि विश्वास ठेवायला शिकावे.
हे पित्याच्या हृदयातून उसळून वाहणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे देवाचा सर्वश्रेष्ठ गुण असलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे आकलनापलीकडचे रहस्य असलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे परमपवित्र त्रित्वाच्या रहस्यातून उसळून वाहणाऱ्या दैवी दयेच्या झऱ्या, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे मानवाच्या किंवा देवदूताच्याही बुद्धीला तळ न लागणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे सारे जीवन आणि सारा आनंद जिच्यातून झरतो त्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे स्वर्गाहूनही श्रेष्ठ असलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे चमत्कारांचा आणि अद्भुत कृत्यांचा उगम असलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे दैवी दये, संपूर्ण विश्वाला कवेत घेणाऱ्या दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे
हे देहधारी शब्दाच्या व्यक्तीत पृथ्वीवर उतरलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे येशूच्या हृदयाच्या उघड्या जखमेतून वाहिलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे आमच्यासाठी, आणि विशेषतः पापी जनांसाठी, येशूच्या हृदयात साठवलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे पवित्र होस्तीच्या स्थापनेत प्रकट झालेल्या अगाध दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे पवित्र ख्रिस्तसभेच्या स्थापनेत प्रकट झालेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे पवित्र बाप्तिस्म्याच्या संस्कारात प्रकट होणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला नीतिमान ठरवण्यात प्रकट होणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे आयुष्यभर आम्हाला साथ देणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे विशेषतः मृत्यूच्या घटकेला आम्हाला कवेत घेणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे आम्हाला अमर जीवन देणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे आमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आम्हाला साथ देणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण करणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे कठोर अंतःकरणाचे पापी देवाकडे वळतात तेव्हा प्रकट होणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे देवदूतांना विस्मयचकित करणाऱ्या आणि संतांनाही आकलन न होणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे देवाच्या सर्व रहस्यांत अगाध असलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे आम्हाला प्रत्येक दुःखातून बाहेर काढणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे दैवी दये, आमच्या सुखाचा आणि आनंदाचा उगम असलेल्या दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे दैवी दये, शून्यातून आम्हाला अस्तित्वात आणणाऱ्या दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे दैवी दये, देवाच्या हातांनी घडवलेले सर्व काही कवेत घेणाऱ्या दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे दैवी दये, देवाच्या सर्व निर्मितीचा मुकुट असलेल्या दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे दैवी दये, आम्ही सारे जिच्यात बुडून गेलो आहोत अशा दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे दैवी दये, व्याकूळ हृदयांना गोड दिलासा देणाऱ्या दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे दैवी दये, निराश जीवांची एकमेव आशा असलेल्या दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे दैवी दये, हृदयांना विसावा देणाऱ्या आणि भयाच्या क्षणी शांती देणाऱ्या दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे दैवी दये, पवित्र जीवांना आनंद आणि परमानंद देणाऱ्या दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे दैवी दये, आशेला कोणताही आधार उरला नसतानाही आशा जागवणाऱ्या दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
+ हे सनातन देवा, तुझी दया अथांग आहे आणि तुझा करुणेचा खजिना अक्षय आहे. आमच्याकडे प्रेमाने पाहा आणि आमच्यात तुझी दया वाढव, म्हणजे कठीण प्रसंगी आम्ही निराश होणार नाही किंवा खचून जाणार नाही, तर मोठ्या विश्वासाने तुझ्या पवित्र इच्छेला स्वतःला समर्पित करू. तुझी इच्छा म्हणजे साक्षात प्रेम आणि दया आहे” (दैनंदिनी 950).
+ हे आकलनापलीकडील आणि अमर्याद दैवी दये, तुझी यथोचित स्तुती आणि आराधना कोण करू शकेल? तू सर्वशक्तिमान देवाचा सर्वोच्च गुण आहेस, पापी मानवाची गोड आशा आहेस. ताऱ्यांनो, धरती आणि समुद्रा, एकाच स्तोत्रात एकरूप व्हा आणि एकसुराने, कृतज्ञतेने व उत्कटतेने आकलनापलीकडील दैवी दयेचे गुणगान करा (दैनंदिनी 951).
सर्व हक्क राखीव: © मजकुराचे संकलन – उर्शुला ग्झेगोर्चिक. सल्ला – दयाळू येशूच्या भगिनींच्या धर्मसंघातील सिस्टर मारिया कालिनोव्स्का. स्रोताचे पूर्ण नाव नमूद करण्याच्या अटीवरच या मजकुराची प्रत काढता येईल. © अनुवाद: एवा ओल्शोवा. प्रतसंपादन: मॅथ्यू विनॉल
दैवी दयेची प्रतिमा – सर्व हक्क राखीव. © दयाळू येशूच्या भगिनींचा धर्मसंघ.
