मराठी

प्रातःसमर्पण

हे येशू,

मरियेच्या निष्कलंक हृदयाद्वारे,

मी माझ्या प्रार्थना, कामे,

आनंद आणि दुःखे,

आजच्या दिवसातील हे सर्व तुला अर्पण करत आहे—

तुझ्या पवित्र हृदयाच्या सर्व हेतूंसाठी,

पवित्र मिस्साबलिदानाशी एकरूप होऊन,

जे जगभर अर्पण केले जाते,

माझ्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी,

माझ्या सर्व नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या हेतूंसाठी,

आणि विशेषतः

पवित्र पित्याच्या हेतूंसाठी.

आमेन.


आणखी प्रार्थना

दैनंदिन चिंतन