मराठी

प्रत्येक दिवस

दिवसभरात माझी उपस्थिती शोध.
मी तुझ्याबरोबर आहे,
  पण माझी उपस्थिती तू ओळखत नाहीस.
मी तुझ्याबरोबर आहे, याची खात्री बाळग.

माझ्या चांगुलपणावरची तुझी श्रद्धा दृढ कर,
  आणि मी तुला मदत करीन व मार्ग दाखवीन, असा माझ्यावर भरवसा ठेव.
तुझ्या शंकांनी तुझी श्रद्धा वाढणार नाही.
केवळ स्वतःच्या बळावर राहिल्याने तुला सामर्थ्य मिळणार नाही.

हे अडथळे दूर सार,
  कारण ते तुला तुझ्या श्रद्धेपासून दूर नेतात.
ज्या गोष्टी तुला माझ्यापासून दूर नेतात,
  त्यांच्यावर विसंबून राहणे सोडून दे.

दररोज तुला जे भेटतात,
  त्यांच्यासाठी स्वतःला दे.
त्यांच्या चिंता हलक्या करणारी शांती त्यांच्यापर्यंत पोहोचव.
ज्यांना गरज आहे, त्यांना सुज्ञ सल्ला दे.
ज्यांची दिशाभूल झाली आहे, त्यांना योग्य मार्ग दाखव.
आत्म्याने गरीब असलेल्यांना बळ दे,
  जेणेकरून त्यांना माझी ओळख होईल.

या फळांचा शोध घे आणि ती मिळवण्याची आस धर,
  जेणेकरून तुझी भरभराट होईल आणि तुझा प्रभाव पडेल
  त्या लोकांवर, जे तुला रोजच्या वाटचालीत भेटतात.

माझ्या देणग्यांनी मला तुला परिपूर्ण करू दे,
  आणि त्या देणग्यांचा लाभ इतरांनाही होऊ दे.
माझे स्वरूप अधिक जाणून घेण्याची ज्यांना गरज आहे,
  त्यांच्यावर तुझ्या आचरणातून प्रभाव पाड.
मला तुझ्याद्वारे कार्य करू दे
  आणि या कार्यासाठी तुला माझे साधन बनवू दे.

पुढील चिंतन

अनुक्रमणिका