तुझ्या अपेक्षा तुला चुकीच्या दिशेने नेऊ शकतात.
तुझे वागणे एका ठरावीक दिशेने जाईल.
तू ज्या वाटेने जात आहेस, ती नीट तपासून पाहा.
ती वाट तुला माझ्या घरी नेते का?
ती तुला माझ्या आश्रयाला आणते का?
तू ज्या वाटेने जात आहेस, ती तुला माझ्याकडे नेते का?
तुझी वाट माझ्या घराकडे वळव,
कारण मी तुझ्या येण्याची वाट पाहत आहे.
जे तुला उपयोगी पडणार नाही, ते बाजूला ठेव.
तुझ्यासाठी माझ्या मनात जी इच्छा आहे, तिच्यातून धीर घे.
तू कोणत्या दिशेने जात आहेस ते तपासून पाहा आणि तुझी वाट माझ्याकडे वळव.
माझ्या मार्गाने चालायला मी तुला मदत करीन.
माझ्या मदतीवर भरवसा ठेव,
कारण मी तुला चुकीच्या दिशेने नेणार नाही.
मी देत असलेल्या प्रेरणांवर विश्वास ठेव,
कारण हे तुझ्यासाठीच आहे.
मी तुझ्यासाठी ठरवलेला मार्ग ओळख आणि त्यावरून चाल.
कोणत्या भीतीकडे तू लक्ष द्यायला हवे?
कोणता विलंब तुझ्या उपयोगी पडतो?
तू कृती करशील याची मी वाट पाहत आहे.
हे कर, म्हणजे तुला माझे मार्गदर्शन लाभेल.
