
हे येशू, माझ्यावर तुझे अमूल्य रक्त ओत. माझे शरीर, मन, जीवात्मा व आत्मा; माझे चेतन व अवचेतन मन; माझी बुद्धी व इच्छाशक्ती; माझ्या भावना, विचार, भावावेग व उत्कट ओढी; माझे शब्द व कृती; माझे जीवनातील पाचारण, माझे नातेसंबंध, माझे कुटुंब, मित्रमैत्रिणी व माझ्या मालकीच्या वस्तू या सर्वांवर तुझे अमूल्य रक्त ओत. माझ्या जीवनातील इतर सर्व कृतींचेही तुझ्या अमूल्य रक्ताने रक्षण कर. हे प्रभू, हे सर्व मी तुला अर्पण करतो आणि तू या सर्वांचा प्रभू व स्वामी आहेस, हे मान्य करतो.
हे मरीये, तू स्वतःच्या गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासून मूळ पापापासून मुक्त आहेस. हे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुद्ध आणि पवित्र कुमारी माते, आमच्यापैकी प्रत्येकाला तुझ्या पदराखाली घे. शीलाच्या सद्गुणाला धक्का पोहोचवणाऱ्या सर्व हल्ल्यांपासून व मोहांपासून मला जप आणि माझे रक्षण कर.
हे प्रभू येशू ख्रिस्ता, मी तुला कळकळीने विनवतो: मरीयेच्या पदराखाली मला सतत संरक्षण लाभो, ज्या पवित्र काटेरी झुडपाच्या फांद्यांपासून पवित्र काट्यांचा मुकुट बनवला गेला, त्याचा वेढा माझ्याभोवती असो, आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मी तुझ्या अमूल्य रक्ताने पूर्णपणे न्हाऊन जावो. पित्याच्या अधिक गौरवासाठी, आमच्या रक्षक देवदूतांच्या सोबतीने असे राहण्याची कृपा मला दे.
आमेन.
आध्यात्मिक लढ्यासाठी आणखी प्रार्थना
मुख्य प्रतिमा: ख्रिस्ताच्या अमूल्य रक्ताने झालेले तारण
