मराठी

शांतीचे फळ

तू सुखाच्या शोधात असतोस
  आणि तुला क्षणभरच समाधान मिळते.
तुझा शोध चालूच राहतो,
  पण तुझ्या पदरी अपयश पडते.

सुख मिळवण्यासाठी माझ्याकडे ये
  आणि माझी शांती स्वीकार.
ती तुझी वाट पाहत आहे.

माझी शांती तुझे जीवन अनेक फळांनी समृद्ध करील
  आणि तुझी ओझी दूर करील.
ती तुला आपल्या कवेत घेईल आणि तुझे रक्षण करील.

माझी शांती तुझ्या वेदना कमी करील
  आणि तुला बळ देईल.
तिच्या कृपेची भीती बाळगू नकोस,
  कारण तिच्या आशीर्वादांनी तुझे अहित होणार नाही.

ती तुझ्या वेदना दूर करील
  आणि तुझी व्यथा हलकी करील.
ती तुला मुक्त करील.
ती तुला नवे शहाणपण आणि नवी समज देईल.

माझ्या शांतीची ही देणगी तुला मिळेल,
  जेव्हा तू माझ्याकडे येशील.
तिची फळे स्वीकार
  आणि तिला तुझ्या मदतीला येऊ दे.

पुढील चिंतन

अनुक्रमणिका