तुम्हाला कोणकोणते संदेश मिळतात,
आणि त्यांतून केल्या जाणाऱ्या मागण्यांना तुम्ही कसा प्रतिसाद देता?
एखादा राजकारणी आपली योजना तुम्हाला सांगतो,
कारण तुमची निष्ठा मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
एखादा मित्र तुमच्याशी मनातले बोलतो, कारण त्याला तुमची मान्यता
आणि सल्ला हवा असतो.
तुमच्यासाठी असलेला माझा संदेश या संदेशांपेक्षा वेगळा आहे.
तो तुम्हाला वाट दाखवतो, दिलासा देतो आणि तुमच्यात बदल घडवण्यास सांगतो.
तुम्ही ऐकता त्या इतर संदेशांपेक्षा हा संदेश अधिक महत्त्वाचा नाही का?
तो अधिक उच्च दर्जाचा नाही का?
तो तुमच्याकडून अधिक मागत नाही का आणि तुम्हाला अधिक देत नाही का?
पुष्कळदा हा संदेश
समाजव्यवस्थेच्या संदेशात मिसळला जातो.
माझ्याकडून मिळालेल्या सुज्ञतेने हे केले, तर ते चांगले आहे.
स्वतःच्या फायद्यासाठी माझे वचन समाजाच्या संदेशात मिसळणाऱ्यांपासून सावध राहा.
या दोन संदेशांतील फरकांचा वापर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी करणाऱ्यांपासून सावध राहा.
ज्याचा आत्मा निर्मळ आहे,
त्याला माझ्याकडून सुज्ञता लाभते
आणि तो माझा हेतू सांगतो.
इतरांपेक्षा त्याच्या ज्ञानाला आणि मार्गदर्शनाला अधिक महत्त्व द्या.
जे स्वतःचा स्वार्थ साधू पाहत नाहीत, त्यांच्या मुखातून माझी वचने ऐकायला शिका.
