ज्यांना आपले म्हणणे कुणीतरी ऐकून घ्यावे असे वाटते, त्यांचे संयमाने ऐकून घेतल्याने
माझ्या योजनेत आनंद भरतो.
ज्यांना मी तुझ्याकडे आणतो,
त्यांच्याशी असेच वाग.
त्यांची मने जड झाली आहेत
आणि त्यांच्या ओझ्यांमुळे त्यांना वेदना होत आहेत.
त्यांना मी अधिक स्पष्टपणे दिसावे म्हणून त्यांना मदत कर.
त्यांना आपली मने उघडण्यास मदत कर,
आणि मी त्यांना शांतीचा आशीर्वाद देईन.
इतरांच्याही या गरजा ओळखायला शिक
आणि मी जसे ऐकून घेईन, तसे त्यांचे अनुभव ऐकून घे.
माझ्या सेवकाला माझ्या कृपेशिवाय दुसऱ्या कोणाच्याही कृपेची गरज नाही.
माझ्या कृपेच्या या देणग्या मोकळ्या मनाने स्वीकार,
कारण त्यांतून मिळणाऱ्या आशीर्वादांनी तुला अनेकदा आनंद होईल.
तुझ्यासाठी असलेल्या माझ्या इच्छेपेक्षा अधिक महत्त्वाचे काय आहे?
या इच्छेला शरण जा,
म्हणजे माझा हेतू साधण्यासाठी मी तुझा उपयोग करू शकेन.
माझ्या हेतूला शरण जा,
आणि तुझे त्रास किरकोळ असतील.
माझ्या हेतूला शरण जा,
आणि माझ्या आशीर्वादांतून तुला शांती मिळेल.
माझ्या हेतूला शरण जा,
आणि माझे हृदय तुझ्या हृदयाचे होईल.
