तुझं भग्न मन घेऊन माझ्याकडे ये.
मी तुला मुक्त करीन.
तुझ्या मनातली वेदना माझ्यापुढे मोकळी कर.
या परीक्षेतून मी तुला बाहेर काढीन.
तुझ्या हृदयात माझं स्वागत कर,
कारण तू मला हाक द्यावी म्हणून मी इथेच आहे.
तुला माझ्याकडून काय हवं आहे?
तुला कशाची भूक आहे?
तुझ्या आत्म्याला माझ्यात विसावा घेऊ दे.
तुला माझ्यातच शांती लाभते.
माझ्या हृदयात ये
आणि त्याच्या ज्वालेने जागृत हो.
