प्रत्येक दिवस नवी जाणीव घेऊन येतो.
प्रत्येक दिवसाचा खजिना तुमच्यासमोर उलगडत जातो.
आज जे काही लाभले आहे, त्यातली समृद्धी शोधा.
प्रत्येक नवा अनुभव जसा लाभतो, तसा त्याचे कौतुक करा.
त्यातून मिळणारा लाभ पदरी पाडून घ्या.
त्याच्या फळांचा आनंद घ्या.
कोणी गैरकृत्य करील असे गृहीत धरू नका,
कारण अशा विचाराने तुम्ही खिन्न व्हाल.
घडणाऱ्या गोष्टींत केवळ माझा हात पाहा.
त्यातून तुम्हाला धीर मिळू द्या.
तेच तुमचे ध्येय होऊ द्या.
ते तुमचे स्वतःचे होऊ द्या.
