मराठी

आजारी लोकांसाठी

आजारी असलेल्यांचे पोषण करा,
  कारण ते स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत.
तुम्ही त्यांना जी मदत करता, ती मला आवडते.
तुमचा संकोच, भीती किंवा विरोध
  तुमच्या मार्गात आड येऊ देऊ नका.

आजारी असलेल्यांना द्या,
  कारण ही माझी इच्छा आहे.
त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या मोहाला बळी पडू नका,
  कारण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देण्याची त्यांना गरज आहे.
स्वतःला त्यांच्या सेवेत द्या,
  कारण याने मला आनंद होईल.

त्यांना शांती आणि आशा द्या.
त्यांच्या मनातल्या भीतीविषयी ऐकून घ्या आणि त्यांच्याशी संयमाने वागा.
मनाने त्यांचे व्हा,
  कारण त्यांना तुमच्या आपुलकीची आणि सहवासाची गरज आहे.

पुढील चिंतन

अनुक्रमणिका