मराठी

मला मुक्त कर

तुझे ज्ञान मला दे.
हे प्रभू, मी तुझ्या राज्याची वाट पाहत असताना
  मला तुझी कृपा दे.

तुझ्या मुखाचे तेज माझ्या डोळ्यांवर पडू दे,
  म्हणजे मला तू स्पष्ट दिसशील.
प्रभू, मला जीवन दे,
  म्हणजे मला तुझी सेवा करता येईल.

तुझ्याजवळ कसे यावे, हे मला माहीत नाही.
प्रभू, मला शिकव,
  म्हणजे मला तुला ओळखता येईल.
हे प्रभू, मला मुक्त कर,
  म्हणजे मला तुझ्यासोबत राहता येईल.

पुढील चिंतन

अनुक्रमणिका