येणारा प्रत्येक दिवस
तुमच्यासाठी नवा विचार घेऊन येतो.
प्रत्येक दिवशी जे घडते
ते तुमच्यासाठी नवा आशीर्वाद आहे, असे माना.
चांगल्या दिवसांचे आपण स्वागत करतो;
कठीण दिवस मात्र क्लेश देतात.
नव्या आशेने आणि नव्याने उमगणाऱ्या जाणिवांनी
प्रत्येक दिवसाला सामोरे जायला शिका.
तुम्ही ओझ्याने दबून जाता, तेव्हा
जीवनात घडणाऱ्या प्रसंगांत मी तुम्हाला कसे मार्गदर्शन करतो, याचा विचार करा.
मी तुमचे अहित करणार नाही.
तुमची श्रद्धा वाढू द्या.
तुमच्या आशेतून तुम्हाला शांती लाभू द्या.
तुमच्या जीवनात एकही क्षण असा जात नाही,
जेव्हा मी तुमच्यासोबत नसतो.
जीवनातल्या प्रसंगांना सामोरे जाताना
या जाणिवेतून दिलासा घ्या.
जे माझ्या सान्निध्यात नाहीत, त्यांच्याकडे लक्ष द्या
आणि त्यांना माझ्या सान्निध्यात येण्यास मदत करा.
आपली ओझी उतरवून ठेवण्यास त्यांना मदत करा.
