मराठी

आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या परममूल्यवान रक्ताची लितानी

हे प्रभू, दया कर. हे प्रभू, दया कर.
हे ख्रिस्ता, दया कर. हे ख्रिस्ता, दया कर.
हे प्रभू, दया कर. हे प्रभू, दया कर.

हे ख्रिस्ता, आमचे ऐक. हे ख्रिस्ता, आमचे ऐक.
हे ख्रिस्ता, कृपापूर्वक आमचे ऐक. हे ख्रिस्ता, कृपापूर्वक आमचे ऐक.

हे स्वर्गातील देवपित्या, आमच्यावर दया कर.
हे देवपुत्रा, जगाच्या उद्धारकर्त्या, आमच्यावर दया कर.
हे पवित्र आत्म्या, हे देवा, आमच्यावर दया कर.
हे परमपवित्र त्रैक्या, एकमेव देवा, आमच्यावर दया कर.

हे ख्रिस्ताचे रक्त, सनातन पित्याच्या एकुलत्या एका पुत्राचे रक्त, आमचे तारण कर.
हे ख्रिस्ताचे रक्त, देहधारी देववचनाचे रक्त, आमचे तारण कर.
हे ख्रिस्ताचे रक्त, नव्या व सनातन कराराचे रक्त, आमचे तारण कर.

हे ख्रिस्ताचे रक्त, प्राणांतिक वेदनेत भूमीवर पडलेले रक्त, आमचे तारण कर.
हे ख्रिस्ताचे रक्त, फटके मारले जात असताना विपुल प्रमाणात सांडलेले रक्त, आमचे तारण कर.
हे ख्रिस्ताचे रक्त, काट्यांचा मुकुट चढवला जात असताना वाहिलेले रक्त, आमचे तारण कर.
हे ख्रिस्ताचे रक्त, क्रुसावर सांडलेले रक्त, आमचे तारण कर. 
हे ख्रिस्ताचे रक्त, आमच्या तारणाचे मोल, आमचे तारण कर.
हे ख्रिस्ताचे रक्त, ज्याच्याविना पापांची क्षमा नाही, आमचे तारण कर.

हे ख्रिस्ताचे रक्त, पवित्र युखरिस्तातील पेय आणि आत्म्यांना तजेला देणारे रक्त, आमचे तारण कर.
हे ख्रिस्ताचे रक्त, दयेचा झरा, आमचे तारण कर.
हे ख्रिस्ताचे रक्त, दुष्ट आत्म्यांवर विजय मिळविणारे रक्त, आमचे तारण कर.

हे ख्रिस्ताचे रक्त, रक्तसाक्षींचे धैर्य, आमचे तारण कर.
हे ख्रिस्ताचे रक्त, श्रद्धेची साक्ष देणाऱ्या संतांचे बळ, आमचे तारण कर.
हे ख्रिस्ताचे रक्त, कौमार्यव्रतधारी कुमारिकांना घडविणारे रक्त, आमचे तारण कर.

हे ख्रिस्ताचे रक्त, संकटात सापडलेल्यांचा आधार, आमचे तारण कर. 
हे ख्रिस्ताचे रक्त, ओझ्याखाली दबलेल्यांना दिलासा देणारे रक्त, आमचे तारण कर.
हे ख्रिस्ताचे रक्त, दुःखातील सांत्वन, आमचे तारण कर.

हे ख्रिस्ताचे रक्त, पश्चात्ताप करणाऱ्यांची आशा, आमचे तारण कर.
हे ख्रिस्ताचे रक्त, मरणासन्न जीवांचे सांत्वन, आमचे तारण कर. 
हे ख्रिस्ताचे रक्त, अंतःकरणांना शांती व कोमलता देणारे रक्त, आमचे तारण कर.

हे ख्रिस्ताचे रक्त, अनंत जीवनाची हमी, आमचे तारण कर.
हे ख्रिस्ताचे रक्त, आत्म्यांना शुद्धिस्थानातून मुक्त करणारे रक्त, आमचे तारण कर.
हे ख्रिस्ताचे रक्त, सर्व गौरवास व सन्मानास सर्वथा पात्र असलेले रक्त, आमचे तारण कर.

हे देवाच्या कोकरा, जगाची पापे दूर करणाऱ्या, हे प्रभू, आम्हाला अभय दे. 
हे देवाच्या कोकरा, जगाची पापे दूर करणाऱ्या, हे प्रभू, कृपापूर्वक आमचे ऐक.
हे देवाच्या कोकरा, जगाची पापे दूर करणाऱ्या, हे प्रभू, आमच्यावर दया कर.

वचन: हे प्रभू, तू आपल्या रक्ताने आमचा उद्धार केलास.
प्रतिसाद: आणि आम्हाला आमच्या देवासाठी एक राज्य बनवलेस.

हे सर्वसमर्थ आणि सनातन देवा, तू आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगाचा उद्धारकर्ता म्हणून नेमलेस आणि त्याच्या रक्ताने प्रसन्न होण्याचे तू इच्छिलेस. आम्ही तुला विनवतो: आमच्या तारणाचे मोल असलेल्या या रक्ताची भक्तिपूर्वक आराधना करण्यास आम्हाला पात्र कर. त्याच्या सामर्थ्याने या जीवनातील अनिष्टांपासून आमचे रक्षण होवो, जेणेकरून स्वर्गात आम्ही त्याच्या फळांचा आनंद सदैव अनुभवावा. त्याच ख्रिस्ताद्वारे, आमच्या प्रभूद्वारे. आमेन.


सर्व प्रार्थना

आध्यात्मिक लढ्यासाठी आणखी प्रार्थना

मुख्य चित्र: