जीवन तुमच्या ताब्यात नाही.
तुम्ही त्याला दिशा देऊ शकत नाही.
जीवनाच्या सुकाणूवरची पकड सोडा आणि त्याची वाट माझ्याकडे वळवा.
त्याची वाट निश्चित होईल,
आणि त्याची शिडे फाटणार नाहीत.
गरज पडेल तशी मी त्याचे सुकाणू वळवीन,
जेव्हा तुमचा प्रवास माझ्या मार्गाच्या दिशेने सुरू होईल.
ही दिशा निश्चित झाल्यावर,
तुमच्या मनात शंका कशाला?
ही वाट धरल्यावर,
तुम्हाला चिंता कशाची?
इतर दिशांना वळून तुमचा वेळ वाया घालवू नका.
सुकाणूवरची पकड सोडलीत, तर तुम्ही माझ्या भूमीच्या जलप्रदेशात पोहोचाल.
