मराठी

द्विधा मनःस्थिती

तुम्ही उत्तरांच्या शोधात असता, पण तुम्हाला प्रश्न सापडतात.
असे प्रश्न सापडतात, ज्यांना उत्तरेच नाहीत.
कोणत्या उत्तरांनी तुमचे समाधान होईल?

या पेचप्रसंगांत तुमच्या श्रद्धेची परीक्षा होते.
सत्याच्या तुमच्या शोधाची व्याप्ती वाढते
  या अनुभवांतून.
या पेचप्रसंगांना तुम्ही कसे सामोरे जाता?

तुमचा शांतीचा शोध तुम्हाला माझ्याकडे घेऊन येवो,
  आणि तुम्हाला माझ्यात दिलासा लाभो.
मीच तुमचे उत्तर आहे.
मला प्रश्न विचारा;
  उत्तरांसाठी माझ्याकडे वळा.

तुम्हाला उपाय माहीत असण्याची गरज नाही
  तुमच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी,
  कारण तसे झाले तर तुम्ही माझ्या स्वरूपात सहभागी व्हाल.

माणूस म्हणून तुम्हाला असलेल्या मर्यादा ओळखा आणि अशी श्रद्धा ठेवा
  की तुमच्या जाणिवेपलीकडे जे काही आहे, त्या सर्वांत माझाही सहभाग आहे.
जेव्हा तुम्ही मला शरण येता, तेव्हा तुमची श्रद्धा दृढ होते.

तुम्ही जे शोधता ते माझ्यात शोधा;
  जे काही अस्तित्वात आहे, ते सर्व मीच आहे.
तुम्ही जी शांती शोधता ती माझ्यात शोधा,
  कारण तुम्हाला जे आवश्यक आहे ते मी देईन.
तुम्ही खरे कोण आहात, हे माझ्यात शोधा,
  कारण तुम्ही ज्याचा शोध घेत होतात, तो मीच आहे.

जे तुम्हाला समजू शकत नाही, ते मीच आहे.

पुढील चिंतन

अनुक्रमणिका